Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुभाष बापूंना महापालिकेच्या तोंडावरच दिसला हद्दवाढचा विकास ? महापालिका बैठकीत का झाले आक्रमक?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन साधारण साडेचार वर्ष झाले, या कालावधीत एकदाही अशा पद्धतीची बैठक कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अथवा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही तशी शास्त्रशुद्ध आणि शहर तसेच हद्दवाढ भागाची विकासात्मक बैठक राज्याचे माजी सहकार मंत्री तथा दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी घेतली.

विशेष म्हणजे बैठकीला बापू समर्थक नगरसेवक एका ओळीने बसले होते अशी बैठक पहिल्यांदाच झाल्याची चर्चा पत्रकारांमध्ये ऐकण्यास मिळाली बैठकीनंतर पत्रकारांनी सुभाष देशमुख यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी महापौरांकडे बोट करुन निघून गेले त्यामुळे त्यांच्या बाबत नाराजी ऐकण्यास मिळाली.

गेल्या तीस वर्षांपासून हद्दवाढ भाग सोयीसुविधांपासून वंचित आहे. पाणी, रस्ते नाहीत, ड्रेनेजची सुविधा नाही पथदिवे नाहीत, सर्वात जास्त कर या भागातील नागरिक भरत असूनही त्यांना न्याय मिळत नाही, त्यांची कुचंबणा होत आहे. तुम्ही हद्दवाढ भागाकडे लक्ष देणार आहात की नाही, महापालिकेकडे हद्दवाढ विभागाचा विकासाचा आराखडा तरी तयार आहे का, असे खडेबोल आ. सुभाष देशमुख यांनी पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना सुनावले.

 महानगरपालिका हद्दवाढ भागातील समस्या व अडीअडचणी विषयी आ. देशमुख यांनी आढावा   महानगरपालिका सभागृहात घेतला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, मनपा आयुक्त पी. शिवशंकर,उपमहापौर राजेश काळे, भाजप शहराध्यक्ष विक्रांत देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील,श्रीनिवास करली तसेच सर्व अधिकारी वर्ग आणि नगरसेवक उपस्थित होते. हद्दवाढ भागात म्हणाव्या तशा सोयी सुविधा नसल्यामुळे या बैठकीमध्ये आ.सुभाष देशमुख आक्रमक झाल्याचे दिसून आले.

ते म्हणाले की, हद्दवाढ होऊन तीस वर्ष झाले तरी अद्यापही या भागातील नागरिक रस्ते, पाणी ड्रेनेज आदी सोयी सुविधांपासून वंचित आहेत.  हद्दवाढ भागात पाणी सुद्धा पाच ते सहा दिवसांनी कमी दाबाने आणि वेळी अवेळी येत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या भागात  साधे पथदिवे सुद्धा नाहीत. दोन वर्षांपूर्वी एलईडीचा प्रस्ताव दिला होता मात्र अद्यापही तो मंजूर झालेला नाही. या भागातील नागरिक सर्वात जास्त कर महापालिकेला भरतात, मात्र त्यांना मूलभूत सोयी सुविधाही मिळत नाहीत.  या भागातील विकास कामासाठी अनेकवेळा निधी दिलेला आहे, मात्र कामे झाली नसल्यामुळे तो निधी परत गेलेला आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. 

हद्दवाढ भागात पुरेशी जागा असूनही लहान मुलांसाठी क्रीडांगण नाही, ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क नाही. यासाठीही निधी दिलेला आहे.मात्र कामे अद्यापही झालेले नाहीत. जुळे सोलापुरात नाट्यगृहाला जागा मिळावी म्हणून प्रस्ताव दिला आहे मात्र तोही प्रस्ताव रखडलेला आहे. ही कामे लवकर होणे अपेक्षित आहेत. सोलापुरात कंबर तलावासारखे प्रेक्षणीय स्थळ असतानाही येथे पिकनिक पॉईंट करण्यात आलेले नाही. या भागात मीनी पिकनिक पॉईंट होणे आवश्यक आहे. शहरात  येताना प्रत्येक जण सोलापुरात पाहण्यासारखे काहीच जायचे कशाला असा विचार करत आहे. सोलापूर  हे ज्येष्ठांचे शहर होत चाललेले आहेत  शहरातील युवक शिक्षणासाठी नोकरीसाठी अन्य शहरात जात आहेत.  असे झाल्यास सोलापूरचा विकास होणे शक्य नाही. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे  मात्र सोलापूरची अवस्था पाहिल्यावर आपण त्याला पात्र आहोत का असा प्रश्न पडत आहे.

 महापालिका अधिकाऱ्यांकडे हद्दवाढ भागात कोणती कामे झाली, कोणती कामे पेंडिंग आहेत कोणत्या कामाचा विकास निधी परत गेला आहे, हद्दवाढ विभागाचा विकास करण्याचा आराखडा तयार आहे का, अशी विचारणा यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी केली. महापालिकेने सुरू केलेली गुंठेवारी योजनाही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही त्याबाबत ही महापालिका जनजागृतीमध्ये कमी पडत आहे. या सर्व व्यथा पाहता महापालिकेचे  हद्दवाढ भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट जाणवते.  त्यामुळे  पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी हद्दवाढ विभागाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे आणि येथील लोकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी अपेक्षाही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.


SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसला जोडलेले पुरुषच महिलांचा सन्मान करणारे? ; आमदार प्रणिती शिंदेंचे वक्तव्य

Next Post

विजयकुमार देशमुखांचा राजीनामा ‘वेटिंग’मध्येच ; सिद्धाराम म्हेत्रेंनी केले हे वक्तव्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

विजयकुमार देशमुखांचा राजीनामा 'वेटिंग'मध्येच ; सिद्धाराम म्हेत्रेंनी केले हे वक्तव्य

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996514
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group