राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यात सांगोला तसेच बार्शी तालुक्यात भेटी होत्या. सायंकाळी पाचच्या दरम्यान फडणवीस हे बार्शी शहरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या निवासस्थानी होते त्याचवेळी काँग्रेसचे युवक प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांनी त्यांची त्याठिकाणी भेट घेतली, त्या भेटीचा फोटो ‘सिंहासन’च्या हाती लागला आहे.
मनोज कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट का म्हणून घेतली हे मात्र समजले नाही, मात्र फडणवीस यांनीच मनोज कुलकर्णी यांना भेटायला बोलावले असल्याचे बार्शीच्या एका कार्यकर्त्यांकडून समजले. काँग्रेस पक्षाने काही महिन्यांपूर्वीच काकासाहेब कुलकर्णी यांची वक्तृत्व शैली आणि अभ्यास पाहून युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते पद दिले आहे. पक्षाने राज्यातील मोठे पद दिल्याने कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले होते,
कुलकर्णी हे अनेक दिवसांपासून राज्यातील आर्थिक दुर्बल असलेल्या ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे म्हणून शासन पातळीवर प्रयत्न करत आहेत, फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांना निवेदन देऊन ही मागणी त्यांच्या समोर केली होती. तेव्हापासून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. काँग्रेस युवा पदाधिकाऱ्याच्या भेटीनंतर बार्शीत चर्चेला उधाण आले आहे. ही भेट परशुराम आर्थिक विकास महामंडळ साठी की राजकिय भेट होती याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत.


















