Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री भरणेमामा, तुम्हाला झालंय काय? Special Report

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 August 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता होती, सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार असताना एकालाही मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही, शेवटी सोलापूरसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या दिलीप वळसे-पाटील या अभ्यासू आणि उत्तम प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले.


वळसे पाटलांनी तीन महिने चांगल्या पद्धतीने काम करताना जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली कोरोनाचा संसर्ग सुरू झाला त्यात वळसे-पाटील वयाने जास्त आणि ये-जा करणे शक्य नसल्याने सोलापुरातून पालकमंत्री बदला अशी मागणी जोर धरली. तसेच त्यांनी स्वतःहून पालकमंत्रीपद बदलण्याची विनंती केली. त्यानंतर पवारांच्याच जवळचे असलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली ते केवळ एक वेळेस सोलापूरला आले आणि त्यांच्यासह कुटुंब कोरोना पॉझिटिव झाले त्यानंतर पुन्हा पालकमंत्री बदलण्याची भाषा झाली 


आणि शेवटी सोलापूर जिल्ह्याला लागून असलेले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे इंदापूरचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या गळ्यात सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पडली मामा आपले  गावरान स्टाईलचे तसेच सर्वांमध्ये मिसळणाऱ्या मामांनी पहिल्याच सोलापूरच्या भेटीत सर्वांना आपलेसे केले, वळसे पाटील, आव्हाड आणि भरणे मामा मध्ये बराच फरक आहे.


सोलापूरला दुसरा मामा मिळाल्याने सर्वजणच आनंदी होते कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भरणे मामा यांनी प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीचे काम करून घेतलं त्यानंतर  कोरोनाच्या लाटेत ही जिल्ह्याची जबाबदारी पेलली, त्यांच्या कामाबाबत सोलापूरकर समाधानी आहेत. त्यांनी फिल्डवर काम केले , कोविड काळात  सर्व हॉस्पिटलमध्ये गेले कोरोना पेशंटची संवाद साधला, अनेक रुग्णांना धीर दिला, निश्चितच हे कुठला पालकमंत्री करू शकला नसता, 


ह्याच दरम्यान इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी घ्यायला मंजुरी मिळाली पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हा मुद्दा प्रचारात आला सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला दिले जाणार असा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आल्यानंतर त्याला सोलापूरशहरासह जिल्ह्यातून तीव्र विरोध झाला सर्व पक्षासह राष्ट्रवादीच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असे असताना दत्तात्रय भरणे मामा यांनी खरे तर भीमा कालवा मंडळाचे सर्व अधिकारी आणि सर्व पक्षाचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्याशी बैठक घेऊन हा विषय समोर मांडायला हवा होता त्यासोबत माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा विषय संपवायला हवा होता  


मात्र मामा हवेत गेले  केवळ प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी  पत्र पाठवले, विरोध वाढत गेला, इंदापूरला पाच टीएमसी पाणी द्यायचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांनी रद्द केला इंदापूरला पाणी मिळण्यासाठी भरणे मामा यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी लढा उभा केला असेल त्यांचे प्रयत्न होते मात्र योग्य पद्धतीने राजकीय व्यासपीठावर आणि माध्यमांसमोर मामांना हा विषय मांडता आला नाही त्यामुळे या प्रकरणात मामा बॅकफूटवर गेले त्यांनी पालकमंत्री पद सोडण्याची भाषा केली मात्र धनगर समाजामध्ये भरणे मामा हे चांगल्या प्रतिमेचे नेते असल्याने त्यांना पालक मंत्रिपदावर कायम ठेवण्यात आले. तेव्हापासून मामा काहीसे “अस्थिर” वाटतात. त्यांनी त्याचे सर्व खापर माध्यमांच्या माथी फोडलं आहे, राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला कोरोना लस कमी मिळते, पालकमंत्री म्हणून भरणे काय प्रयत्न करतात असे प्रश्न माध्यमे उपस्थित करतात, ते सुध्दा पालकमंत्र्यांना वाईट वाटते, माध्यमांनी प्रशासकीय कामांवर तसेच पालकमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करू नये का? सोलापूर दौऱ्यावर आले की ते प्रत्येक कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधीना लक्ष्य करत आहेत, विशेष म्हणजे शासकीय कार्यक्रमात. 15 ऑगस्ट रोजी तर ‘मामा’ ‘आनंदा’च्या भरात हवेत गेले, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले, त्याच्या बातम्या झाल्या, पण त्याचे ही खापर त्यांनी माध्यमांच्या माथी फोडले. त्या कार्यक्रमाला स्टेजवर वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी समोर 10 कॅमेरे, 100-150 लोक उपस्थित होते, अशावेळी एका जबाबदार मंत्री आणि पदाधिकाऱ्याच्या तोंडून असे शब्द येणे कितपत योग्य होते? त्याची बातमी तर होणारच, अजितदादा ही उजनी बद्दल असेच बोलता बोलता बोलून गेले होते की.


भरणे मामा सोलापूर दौऱ्यावर आले की गडबड-गडबड करतात, दौऱ्याचे नियोजन व्यवस्थित नसते, कार्यक्रमात सुरुवात मुद्देसूद होते नंतर गाडी कुठे घसरते त्यांनाच माहीत, मग हा पत्रकार दिसला की त्याचे नाव घ्यायचे, दुसरा दिसला की त्याचे, काय चाललंय राव? त्यांनी शासकीय कार्यक्रम शासकीय पद्धतीने करावा, माध्यम प्रतिनिधी सोबत अधिकारी विना स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी अशी अपेक्षा माध्यमांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांमधून व्यक्त होतेय.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना ; प्रभाग रचनेचा आराखडा तयार करा

Next Post

ब्रेकींग ! सोलापूरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! सोलापूरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996504
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group