मोहोळ तालुक्यातील पोखरापूर गावातील बाबर वस्ती मध्ये 25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून एका पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या रॉयल क्लासिक स्मार्ट व्हिस्कीचे तब्बल 300 बॉक्स जप्त केले.
ही विदेशी दारू या ठिकाणी विनापरवाना विक्री करण्यासाठी ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक निकाळजे, जवान तांबोळी, होळकर, व्हनगुंटी,यांनी केली. दरम्यान अधीक्षक धार्मिक यांनी या विदेशी दारू ची किंमत सुमारे 21 लाख 69 हजार असल्याचे सांगत आरोपी फरार झाला आहे त्याचा तपास सुरू असल्याचे सांगितलं.



















