राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुमारे एक वर्षाच्या फरका नंतर सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत, आगामी महापालिका निवडणूक मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने शरद पवार यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुद्धा असल्याने जिल्हयाची बांधणी आणि कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरात सुमारे तेराशे हून अधिक नवीन पदाधिकार्यांच्या निवडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत त्या नूतन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून या दौऱ्याची अधिक माहिती घेतली असता आठ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता शरद पवार यांचे आगमन शासकीय विश्रामगृहात होणार आहे, त्यानंतर दोन तास ते शासकीय विश्रामगृहात असून दुपारी बारा वाजता महेश कोठे यांच्या राधाश्री या निवासस्थानी ते भेट देणार आहेत त्याच ठिकाणी ते दुपारचे भोजन करणार अशी माहिती मिळाली. दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा त्यानंतर सायंकाळी पाच वाजता शहर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अशा पद्धतीचा त्यांचा संभाव्य दौरा असल्याची माहिती मिळाली सकाळी 10 ते 12 या वेळेत शहरातील विविध समाजातील प्रमुख मान्यवर व्यापारी कारखानदार यांच्या भेटी आणि निवेदने पवार साहेबांनी स्वीकारावीत अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली.

















