Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिनेस्टाईल किडनॅपिंग : एक कोटीच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण ; सात जणांच्या टोळीला अटक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 October 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पेट्रोल पंप चालविणा-या सोलापुरातील एका डॉक्टरचे अपहरण करून एक कोटीची खंडणी मागितली आणि पुण्यात नेऊन त्याच्याकडून ५ लाख ८८ हजारांची रोकड लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात सोलापूर ग्रामीणच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.

डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय ४७, रा. ५६५, उत्तर कसबा, सोलापूर) यांचा वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे छोटा दवाखाना आणि इंडियन आॕईल कंपनीचा पेट्रोल पंपही आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री डॉ. कुलकर्णी हे पेट्रोल पंप व दवाखान्यात जमा झालेली ५ लाख ८८ हजारांची रोकड घेऊन स्वतःच्या मोटारीने सोलापूरकडे परत येत होते. त्यावेळी वाटेत इनोव्हा मोटार पाठीमागून आली आणि डॉ. कुलकर्णी यांच्या मोटारीपुढे आडवी थांबली. इनोव्हामधून उतरलेल्या सात दरोडेखोरांनी गावठी बंदुकीचा धाक दाखवून डॉ. कुलकर्णी यांना पकडून त्यांचे इनोव्हा गाडीतून अपहरण केले. त्यांना कोयता, काठी, हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. मोहोळ, टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, सासवडमार्गे पुण्यातील वारजे-माळवाडी येथील उड्डाण पुलावर नेल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांना एक कोटीची खंडणी मागत त्यांच्या जवळील ५ लाख ८८ हजारांची रोकड लुटून त्यांना गाडीतून ढकलून दिले होते.

या गुन्ह्याची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली. वारजे-माळवाडीत डॉ. कुलकर्णी यांना दरोडेखोरांनी सोडून दिले, याचा अर्थ त्यापैकी काही दरोडेखोर त्याच परिसरात राहणारे असावेत, या दृष्टिकोनातून तपास केला असता धागेदोरे हाती लागले. चौघे संशयित दरोडेखोर पुण्यात राहणारे असून दोघे वडाळा (उत्तर सोलापूर) गावचे राहणारे आहेत. विकास सुभाष बनसोडे (वय ३१), सिध्दार्थ उत्तम सोनवणे (वय ४२, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), रामचंद्र बालाजी कांबळे (वय २८, रा. न-हे, ता. हवेली, पुणे), वैभव प्रवीण कांबळे (वय २१, रा. जवळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), भारत दत्तात्रेय गायकवाड (वय ३१) आणि मुराद हनीफ शेख (वय ३१, रा. वडाळा, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. यातील तिघेजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सशस्त्र दरोडे, अपहरण, खून आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर दोघेजण सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगून आले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई करताना या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडीसह दुचाकी, लुटीतील अडीच लाखांची रोकड आणि आठ मोबाइल संच आदी ऐवज हस्तगत केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ दिलीप स्वामी यांनी केले मुख्याध्यापकांना भावनिक आवाहन ; काय आहे कारण

Next Post

संतप्त नागरिकांनी गाड्या उचलणाऱ्या क्रेनला रिकाम्या हाती पाठवले ; पहा हा व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

संतप्त नागरिकांनी गाड्या उचलणाऱ्या क्रेनला रिकाम्या हाती पाठवले ; पहा हा व्हिडीओ

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999652
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group