सोलापूर : वाहतूक शाखेच्या वतीने शहरात पार्किंग नसलेल्या जागी लावलेली दुचाकी वाहने उचलली जातात आता मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहने उचलली जात आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भुमी अभिलेख कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये लावण्यात आलेली वाहने वाहतूक शाखेच्या क्रेनने उचलली असता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे युसूफ मेजर व नलिनी कलबुर्गी यांच्यासह नागरिकांनी त्याला जोरदार विरोध केला संतप्त झालेल्या नागरिकांपुढे शेवटी क्रेनमध्ये लावलेली सर्व वाहने खाली उतरण्याची नामुष्की या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर आली आणि रिकाम्या हाताने ते क्रेन जिल्हाधिकारी कार्यालयातून परतले पहा हा व्हिडिओ
















