सोलापूर (गुरुशांत मोकाशी)सरकारकडून कोविड प्रोत्साहन भत्ता मिळावा,शैक्षणिक शुल्क माफ करावे, तसेच BMC अंतर्गत येणाऱ्या कॉलेज मधील निवासी डॉक्टरांच्या स्टॅयपंड मधून कपात करण्यात येनारा TDS रद्द करावे या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
शुक्रवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील ब्लॉक बी याठिकाणी सर्व निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आमच्या मागण्या सनदशीर मार्गाने मान्य व्हाव्यात यासाठी आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान सरकार मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरत असेल तर आम्ही आंदोलनाची धार अधिक तीव्र करू असा इशारा दिला…👇👇👇
◽

















