सोलापूर : लोधी समाजातील जेष्ठ नेते रामसिंग आंबेवाले यांची सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या वतीने शुक्रवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतनभाऊ नरोटे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले , रवी आंबेवाले, सज्जन मनसावाले, शंकर कजाकवाले, राजेश झंपले, गोपाळ कजाकवाले, रमेश कैय्यावाले, राजेश सकी, अतुल कोळेकर, मुकेश फत्तेवाले, अमोल भोसले, रोहित मनसावाले, राहुल दिल्लीवाले, आकाश दिल्लीवाले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
त्यांचा निवडीबद्दल सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतनभाऊ नरोटे, जेष्ठ नेते किसन मेकाले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येयधोरणे लोधी समाजासह इतर समाजात पोहोचवून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची ग्वाही नूतन उपाध्यक्ष रामसिंग आंबेवाले यांनी दिली.

















