Saturday, September 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी कारवाई : भेसळयुक्त दुधाचा साठा पकडला ; सांगोल्यात कारवाई,पेढी सील,अन्न परवाना रद्द

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दूध भेसळीच्या संदर्भात प्राप्त खात्रीशीर गुप्त माहितीवरून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत दक्षता विभाग मुंबई, अन्न व औषध प्रशासन सोलापूर व इतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत सांगोला तालुक्यातील देवळे येथील रणजित शिवाजी व्हनमाने  यांच्या मालकिच्या मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती, या पेढीवर धाड टाकून तपासणी करण्यात आली.  

या तपासणी दरम्यान पेढीमध्ये दुध भेसळीकरीता लिना निळ (अपमिश्रक) या कंपनीच्या 500ml चे 10 सील बंद बॉटल आढळून आल्या. तसेच पेढीच्या बाजूंला असलेल्या युवराज भगवान अलदार (भागीदार) यांच्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडर (अपमिश्रक) अमूल ब्रॅण्ड चे 25 kg चे 3 बॅग आढळून आल्या. या ठिकाणी लिना निळ (अपमिश्रक) बाबत रणजित शिवाजी व्हनमाने (भागीदार) यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर निळ ही गाय दूधामध्ये टाकून गायीच्या दुधास म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. यावरुन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स  या पेढीमार्फत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानंतर या ठिकाणाहून गाय दुध या अन्न पदार्थाचे तसेच व्हे पावडर व लिना निळ या अपमिश्रकाचे नमुने विश्लेषणास घेऊन उर्वरित 1.गाय दूध 298 ली.- किंमत 8046, व्हे पावडर- (अपमिश्रक) 74 kg किंमत-12074, निळ (अपमिश्रक) (लीना) -6 बॉटल – किंमत 540 असे एकूण – 20,660 चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेले रासायनिक केमिकल्सचा वापर करुन तयार केलेल्या गाय दूधाचा सुमारे 298 लिटरचा साठा नष्ट करण्यात आला. त्यानंतर या पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देऊन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती,मु.पो- देवळे ता- सांगोला जि- सोलापूर या पेढीस मंजुर असलेला अन्न परवाना रद्द करण्यात आलेला आहे. 

याप्रकरणी मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स या पेढीचे भागीदार रणजित शिवाजी व्हनमाने व इतर 5 भागीदार तसेच सदर पेढीकडून भेसळयुक्त दुध स्विकारुन भेसळीस हातभार लावणारी पेढी मे. चैतन्य संकलन केंद्र,पंढरपूर, तसेच व्हे पावडर (अपमिश्रक) पुरवठा करणारी पेढी मे. श्री बालाजी ट्रेडर्स,जयसिंगपूर ता – शिरोळ जि- कोल्हापूर यांच्याविरुद्ध भा.दं.वि कलम 34, 272, 273, 420 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत  सांगोला पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.  त्यांच्याविरुध्द अतिरिक्त भा. दं. वि. कलम 328 व अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे कलम 38(6) व कलम 59 नुसार फिर्याद देण्यात आलेली आहे.  ही कारवाई  23 सप्टेंबर रोजी रात्री झाली. 

अन्न प्रशासन आयुक्त परिमल सिंग, पुणे विभाग सह आयुक्त शिवाजी देसाई, सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत, यांच्या मार्गदर्शनखाली अन्न व औषध प्रशासनातील दक्षता विभाग अन्न सुरक्षा अधिकारी ज्ञानेश्वर महाले, अरविंद खडके, राम मुंडे, मिलिंद महागंडे तसेच सातारा कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रोहन शहा, कोल्हापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी  डॉ. मंगेश लवटे,  महेश मासाळ, गणेश कदम व सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, उमेश भुसे यांच्या पथकाने पार पाडली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचा शानदार अनावरण सोहळा ; अशा “unsung hero”ना मोदी सरकार प्रकाशात आणतयं

Next Post

पालकांनो, तुमचा पाल्य पाचवीत आहे का? पहा ही महत्त्वाची माहिती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकांनो, तुमचा पाल्य पाचवीत आहे का? पहा ही महत्त्वाची माहिती

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999656
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group