सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर, तालुका-मोहोळ येथे विद्यालयात इयत्ता 6 वी वर्गासाठी सन 2022-23 वर्षासाठी प्रवेश परीक्षा 2022 चे अर्ज ऑनलाइन पध्दतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे.
ही परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. नवोदय विद्यालयाची सामान्य वैशिष्ट्ये, परीक्षेसाठी पात्रता, सविस्तर अधिसूचना इत्यादी परीक्षेसंदर्भाची अधिक माहिती, प्रवेश परीक्षेचे ऑनलाइन अर्ज नवोदय
विद्यालयसमितीच्या www.navodaya.gov.in तसेच https://cbseitms.nic.in/registrationClass6/registrationClass6 या वेबपोर्टलवर नि:शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑफलाइन अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्यापूर्वी माहितीपत्रकातील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व नोंदणी पूर्ण झालेची खात्री करुन भविष्यातील संदर्भासाठी प्रवेश अर्जाची प्रिंट घ्यावी.
प्रवेश अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण असल्यास प्राचार्य एस.सी. कोठडी मोबा.नं 9623370493, 9579734200, 9890249607 या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य कोठडी यांनी केले आहे.



















