सोलापूर : पावसाळा म्हटलं की कुमार चौक पाण्यात बुडायचा यंदा मात्र यातून चौकाची सुटका झाली नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या प्रयत्नाला मोठं यश आलं आहे.
पावसाळ्यात कुमार चौक परिसरातील हे दृश्य …पाण्यात चौक बुडालेला आणि घराघरातून शिरणारं पाणी …यंदा मात्र परीसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला …कुमार चौकाची पाण्यातून सुटका झाली …भयंकर अशा समस्येतून कुमार चौक आणि परिसर मुक्त झाला …नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा निर्धार आणि पाठपुरावा यामुळं कुमार चौक पाण्याच्या विळख्यातून बाहेर आला नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
प्रभाग 15 मध्ये हा कुमार चौकाचा परिसर येतो नाहीशा झालेल्या गटारी यामुळं पाण्याच्या निचऱ्याचा इथे प्रश्न होता अशातच रेल्वे कडून पाण्याचा प्रवाहच अडवून ठेवण्यात आला यामुळं पावसाळ्यात कुमार चौक हा पुरता पाण्याखाली जात होता प्रभागाच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी ऑन द स्पॉट दाखल होत नागरिकांना त्यांनी शब्द दिला
समस्या मुळासकट नाहीशी करण्याचा निर्धार त्यांनी केला कुमार चौकातील समस्येचं मूळ त्यांनी शोधून काढल इथल्या नाल्यावर रेल्वेनं बांध घालून पाणी अडवून ठेवलं होतं याबाबत जाब विचारत सुरुवातीला या पाण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून घेतला …आता इतकं करूनही भागणारं न्हवतं …मोठा निधी आणि कायमस्वरूपी उपाययोजनेची इथे गरज होती आणि मग स्मार्ट सिटी योजनेतून इथलं काम हाती घेण्यात आलं.
दोन मोठ्या स्टीम लाईन टाकण्यात आल्या कुमार चौकाची पाण्यातून सुटका करण्यासाठी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी कायम याचा पाठपुरावा ठेवला चाललेल्या कामावर कायम लक्ष ठेवलं पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईप लाईनच्या व्यासाबाबत त्यांनी नगरअभियंत्यांसह अधिकारी वर्गासमोर वस्तुस्थिती मांडली सूचना केल्या.
कुमार चौकातील समस्येबाबत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी जी आग्रही भूमिका घेतली सुधारणे कामी जे सातत्य ठेवलं त्याचा दृश्य परिणाम आता समोर येतोय शहरात मोठा पाऊस होऊनही कुमार चौकात पाणी साचलं नाही पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत असल्याने घरा घरातून शिरणारं पाणी बंद झालं कित्येक वर्षा पासूनची ही समस्या सोडवण्यात नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना यश आलं सामाजीक कार्यकर्ते जॉन फुलारे यांनी देखील या कामी कायमच लक्ष ठेवल येथील नागरिकाना हा मोठा दिलासा ठरतोय.
कुमार चौकाची पाण्यापासून सुटका करण्यात यश मिळालं याबद्दल नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी समाधान व्यक्त केलं या पुढील काळातही इथल्या कामाबाबत पाठपुरावा चालूच राहील परिसर विकासाबाबत कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली, शहरात इतरत्र रस्त्यांची वाट लागलीय अशा परिस्थितीत कुमार चौक वासीयांना मात्र यंदाच्या पावसाळ्यात चांगलाच दिलासा मिळाला साचणाऱ्या पाण्यातून परिसर मुक्त झाला याबद्दल त्यांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचे आभार मानले.


















