सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांची कार्यकर्ता जनसंपर्क मोहीम मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी गावात घेण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी केले होते, हा कार्यक्रम म्हणजे सुरेश हसापुरे यांचे शक्तिप्रदर्शन असल्याचे दिसून आले, मोठा जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित होता.
हसापुरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्यांनी आपल्या भाषणात अनेक “राज” ओपन केले, आपले शिंदे परिवार व विशेष करून मोहिते पाटील यांच्या वरील प्रेम त्यांनी दाखवून दिले, जेव्हा मोहिते पाटलांकडे होतो सर्व निवडणुका जिंकल्या पण काँग्रस मध्ये आलो, सर्व निवडणुका हरलो असे सांगत आता मी पुन्हा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले पहा हसापुरे यांचे संपूर्ण भाषण


















