सोलापूर : मंगळवारी मुख्याध्यापक भवन सोलापूर येथे सोलापूर जिल्हयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी बोलावली होती. या बैठकीस जवळपास २५ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभागातील विविध प्रश्न सर्व संघटनांनी एकत्र येऊन सोडविण्यासाठी व सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ तयार करण्यासाठी या वैठकीचे आयोजन केले होते. विविध संघटनांच्या प्रतिनिधीने मनोगत व्यक्त करून अशा प्रकारच्या संघटनेची गरज असल्याचे प्रतिपादन करून शैक्षणिक व्यासपीठामध्ये आपली संघटना सहभागी होत असल्याचे सांगितले.
या शैक्षणिक व्यासपीठासाठी अध्यक्ष म्हणून संस्थाचालक संघटनेचे प्रतिनिधी सुभाष माने यांची अध्यक्ष म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा लेवल, राज्य लेवल वरील शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सर्व संघटनांनी एकत्रीत येवून सोडवुया व महाराष्ट्रात एक नवा आदर्श घालून देऊया असे आवाहन व्यासपीठाचे अध्यक्ष सुभाष माने यांनी केले.
या कार्यक्रमास तानाजी माने, आण्णासाहेब भालशंकर, महेश सरवदे, गुरुनाथ वांगीकर, रंगसिध्द दसाडे, बापू नीळ, श्रीधर उन्हाळे, सचिन झाडवुके, दिपक कन्ना, रिजवान शेख, मोहन भोसले, सातलिंग शटगार, शंकर वडणे, जे. आय इंगळगी, जिवन यादव, अमोल चव्हाण, संदीप देशमुख, तुकाराम मेटकरी, गिरिष सोनटक्के, दशरथ गुरव, मुस्ताक शेतसंदी, इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी केले व आभार मुख्याध्यापक संघाचे सचिव बापू नीळ यांनी मांडले.



















