सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व कृषी सभापती अनिल मोटे यांच्यात सध्या टक्केवारी वरून वाद सुरू आहे. अध्यक्ष कांबळे यांच्या स्वीय सहाय्यकाने सभापती मोटे यांच्याकडे टक्केवारीची मागणी केली याची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी उडी घेतली, त्यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
अध्यक्ष कांबळे यांचे कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले आहे, भाजप आमदारांच्या पीए चा वावर का असतो?कांबळे यांना अध्यक्ष करताना जो घोडेबाजार झाला होता त्याची ही वसुली सुरू आहे का? सभापती कडे उघडपणे लाच मागणारा अध्यक्षांचा पीए हा जिल्हा परिषद कर्मचारी आहे, त्यांच्यावर सीईओ स्वामी यांनी गुन्हा दाखल करावा.
अध्यक्ष किती दोषी आहे याची माहिती नाही मात्र त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी, अँटी करप्शन विभागाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी करतानाच उमेश पाटील यांनी अध्यक्षांच्या सहीचे अधिकार काढून घ्यावेत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले पहा काय म्हणाले उमेश पाटील…..

















