सोलापूर : महेश कोठे यांच्या राधाश्री बंगल्यावर शरद पवार हे सदिच्छा भेटीकरिता आले होते, यावेळी भल्याभल्या नेत्यांना बंगल्यात प्रवेश नाकारल्याने कोठे नावाचे गतवैभव परत आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया चागल्याच उंचावल्या होत्या …
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते, हुतात्मा स्मृती मंदिर मधील शहर कार्यकर्त्यांचा मेळावा संपल्या नंतर शरद पवार हे मुरारजी पेठ येथील महेश कोठे यांच्या राधाश्री बंगल्यावर आले होते,दरम्यान नियोजित कार्यक्रमानुसार पवार ह्यांच्या जेवणाची व्यवस्था कोठे यांच्या निवासस्थानी असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,
शरद पवार यांच्या मोटारीची ताफा राधाश्री निवासस्थानी पोहचताच बगल्याचे गेट बंद करण्यात आले त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मनोहर सपाटे दिलीप कोल्हे काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यु एन बेरीया आदी नेत्याना बंगल्यात प्रवेश नाकारला ,दरम्यान मनोहर सपाटे यांनी गेटवर पोलीसांशी वाद घालत शेवटी कोठे यांच्या बंगल्या पासून निघून जाताना दिसून आले.
याच वेळी काॅग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यु एन बेरीया दिलीप कोल्हे माजी आमदार निर्मला ठोकळ आदीना प्रवेश देण्यात आला , कोठेनी निमंत्रित केल्यामुळेच आम्ही आलो अस म्हणत प्रवेश नाकारलेल्या नेत्यानी नाराजी व्यक्त करत परत फिरताना दिसून आले, थोडक्यात काय तर पवारांच्या वर्तनाने अनेकांचे मुल्य कमी केले तर काहीच्या मुल्य कमालीचे वाढल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले.

















