सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे वयाची ओलांडून ही तरुणांना लाजवेल एवढे काम करतात, सध्या त्यांची तब्येत पाहिली तरी त्यांची व्हील पॉवर किती स्ट्रॉंग आहे याचा प्रत्यय येतो. अशा परिस्थितीत ही ते संपूर्ण दिवसभर कार्यक्रम करतात, सलग पंचेचाळीस मिनिटे ते भाषण करतात दोन तास लोकांना भेटतात त्यांची ही ऊर्जा पाहूनच कार्यकर्त्यांमध्ये स्फुलिंग चेतते.
शुक्रवारी शरद पवार हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होते त्यांनी सुरुवातीला सकाळी शासकीय विश्रामगृहात प्रमुख नेत्यांची बैठक घेतली, त्यानंतर सोलापूर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, लगेच ते महेश कोठे यांच्या निवासस्थानी गेले, तिथून पुन्हा हुतात्मा स्मृती मंदिरात जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला हा मेळावा सुरू असताना सभागृह हाऊसफुल्ल होते बाहेर स्क्रिन लावण्यात आल्या होत्या, बरेच जण बाहेर बसून शरद पवारांचे भाषण ऐकत होते,
याचवेळी एक नेता पवारांचे भाषण ऐकताना दिसून आला, ते नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हते तर ते होते काँग्रेस पक्षाचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी सभापती भीमाशंकर जमादार . ते पत्रकारांच्या फोटो मध्ये आलेच, त्यांना विचारले असता महाविकास आघाडी आहे, आणि पवार साहेब हे तर देशाचे नेते आहेत, त्यांचे भाषण प्रेरणादायी असते असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम संपवून पुन्हा तब्बल दोन तास पवारांनी सोलापूरकरांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.

















