भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रती हेक्टर चार लाख रूपये प्रकल्पमूल्य ग्राह्य धरुन 40 टक्क्यांप्रमाणे एक लाख 60 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.
लागवडीची पद्धत
ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडामध्ये 3 मी. X3 मी., 3 मी X 2.5 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सिमेंट काँक्रीट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधीत कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.


















