सोलापूर : नगरसेवक तौफिक शेख यांच्यावतीने आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 21 मध्ये महिलांना साडी वाटप, ज्येष्ठ नागरिकांना चादर वाटप, महिलांना उज्वला गॅस योजनेतून 82 महिलांना गॅस, शेगडी वाटप तसेच प्रभागातील विकास कामाचे उद्घाटन पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका तस्लिम शेख, पूनम बनसोडे, बाबा मिस्त्री, आरिफ शेख, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे, प्रमोद गायकवाड,इरफान शेख, नुरुद्दीन मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होती, पालकमंत्री मामांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले. तौफिक शेख यांच्या टीमने पालकमंत्र्यांचे मन जिंकले. तौफिक पैलवानांनी आपल्या भाषणात नई जिंदगी भागातील अनेक समस्या मांडल्या, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, पहा पैलवान काय म्हणाले…..

















