भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेल याने इतिहास रचला. एका डावात एजाजने १० बळी घेण्याचा पराक्रम केला.
याआधी भारताच्या अनिल कुंबळे याने पाकिस्तान विरोधात एका डावात १० बळी घेतले होते.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड झाला आहे. न्यूझाीलंडचा स्पिनर एजाझ पटेलनं हा ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमधील सर्व 10 विकेट्स पटेलनं घेतल्या आहेत. पटेलनं पहिल्या दिवशी 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्यानं दुसऱ्या दिवशीही भेदक बॉलिंग करत उर्वरित सर्व 6 विकेट्स घेत कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी केली. एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणारा तो क्रिकेट विश्वातील तिसरा बॉलर बनला आहे.
कोण आहे एझाझ पटेल?
9 टेस्ट, 7 ट्वेन्टी20 सामन्यात एझाझने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. एझाझचा जन्म मुंबईचा पण आठव्या वर्षी आईवडिलांसह तो न्यूझीलंडला रवाना झाला.
वेगवान गोलंदाज म्हणून एझाझने खेळायला सुरुवात केली. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार एझाझ फिरकी गोलंदाज झाला.
न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर एझाझला तीन वर्षांपूर्वी पदार्पणाची संधी मिळाली.
पदार्पणाच्या कसोटीतच 7 विकेट्स घेत एझाझने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता.


















