सोलापूर : दाखल गुन्ह्यात कोणतीही कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी 10 हजाराची लाच मागून पहिला हप्ता 2 हजार रुपये स्वीकारताना पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.Naik-caught-in-anti-corruption-trap-while-accepting-bribe-of-Rs-2,000
सर्जेराव शंकर पाटील, वय ३८ वर्षे, व्यवसाय नोकरी, पोलीस नाईक बनं ११७४ नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे,असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे विरुध्द सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे परस्पर विरोधी तक्रारी अर्ज दाखल असुन या अर्जानुसार तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करता सदर प्रकरणामध्ये सहकार्य करण्यासाठी पोलीस नाईक सर्जेराव पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे रुपये १० हजारची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती रुपये ५ हजार स्विकारण्याचे मान्य करून त्यातील पहिला हप्ता म्हणुन रु २ हजार लाच रक्कम सदर बझार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे स्विकारली.
त्यावेळी पोलीस नाईक पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर , पोलीस अंमलदार सपोफी कोळी, पोना घुगे, पोशि जानराव, पोशि सण्णके, पोशि मुल्ला चापोशि सुरवसे सर्व ने अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

















