पंढरपूर : सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदावर हनुमंत ज्ञानेश्वर भोसले यांची निवड करण्यात आली.
ही निवड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष श्रीकांत थोरात व जिल्हा संपर्क प्रमुख पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आली. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले यांच्या हस्ते हनुमंत भोसले यांना देण्यात आले.
रयत क्रांती संघटनेचे ध्येय धोरणे तळागाळा पर्यंत पोचून शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही नूतन उपाध्यक्ष हनुमंत भोसले यांनी दिली. या निवडीबद्दल भोसले यांची पंढरपूर तालुका तसेच विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


















