सोलापूर : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने संघटनेच्या कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन चंचल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर होते. सरचिटणीस संजय कांबळे, कार्याध्यक्ष बी.के.चव्हाण, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नानासाहेब शिवशरण, वैजिनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर व्हटकर, सावळा काळे, श्रीमती कांगरे, निरंजन वाघमारे, योगेश कटकधोंड, तानाजी होटकर, मोहीत वाघमारे, अविनाश गोडसे, सुहास गुरव, अनिल जगताप, मकरंद बनसोडे, अरूण बनसोडे, धनंजय जगताप, नागसेन कांबळे, आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

















