सोलापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष , उत्तर सोलापूर अंतर्गत स्थापित स्वयं सहायता समूहाला उपजीविका बळकटीकरणासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया , शाखा नान्नज च्या वतीने 10 डिसेंबर रोजी एकूण 62 स्वयं सहायता समूहाला 1 कोटी 21 लाख रुपये बँक कर्ज वितरण करण्यात आले.
या बँक कर्ज वितरण मेळाव्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, एसबीआयच्या सहाय्यक महाप्रबंधक उमा साळे, क्षेत्रीय प्रबंधक राजीव गुप्ता, गटविकास अधिकारी प्रशांत देशमुख, नान्नज शाखा व्यवस्थापक निखिल केत, मीनाक्षी मडवळी जिल्हा अभियान व्यवस्थापक , भगवान कोरे, राहुल जाधव, सरपंच राणी टोणपे आणि उपसरपंच ज्योती दडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूनम दुध्याल, तालुका अभियान व्यवस्थापक व आभार प्रदर्शन पोपट चौधरी यांनी केले.
हा कर्ज वितरण मेळावा यशस्वी होण्यासाठी श्रीमती पूनम दुध्याल, प्रमोद चिंचुरे, उषा तोंडसे, विमल गोरे, विजया पाटील, शीतल मोरे, रोहिणी मूळे, वैशाली कुंभार यांनी घेतले.
ज्या स्वयं सहायता समूहाला कर्ज वितरण करण्यात येणार होते त्या समूहातील महिला सदस्य उपस्थित होते


















