सोलापूर : लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर यांचे ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले मे २०२१ मध्ये. सहा महिने उलटून गेलेले आहेत. या सहा महिन्यात या पुस्तकासंदर्भात विविध घटकांनी आक्षेप नोंदवले आहेत. याचे सोलापुरात पडसाद उमटले,
हॉटेल बालाजी सरोवर मध्ये सोलापूरच्या छाया-प्रकाश फाऊंडेशनच्यावतीने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना ‘कलाकौस्तुभ’ पुरस्कार तर मूळचे सोलापूरचे चतुरस्त्र लेखक अच्युत गोडबोले यांना ‘अभिवंदन’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
सोलापुरात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संभाजी आरमार च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतले मुळा धरण दोन दिवसापूर्वीच संभाजी आरमार संघटनेने गिरीश कुबेर यांचा कार्यक्रम घेऊ नये, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत संभाजी आरमार कुबेर यांना धडा शिकवेल असा इशारा दिला होता.
याच पार्श्वभूमीवर हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना संभाजी आरमार आणि संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेनंतर संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी प्रतिक्रिया देताना पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला. पोलिसांनी आम्हाला धोका दिला, आमच्याशी गद्दारी केली असा थेट आरोप त्यांनी केला आहे पहा काय म्हणाले डांगे….


















