सोलापूर : सभासदांबरोबर त्यांच्या पश्चात कुटुंबाची काळजी घेणारी पतसंस्था क्रमांक एक याचे कार्य अत्यंत चांगले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. संस्थेने राबवलेल्या विमा योजनेतून पाच सभासदांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये विमा व इतर रकमेचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. सभासद हिताबरोबर सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग हा वाखण्याजोगी आहे असे याप्रसंगी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
यावेळी संतोष धोत्रे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अजयसिंह पवार मुख्य लेखा व वित अधिकारी, चंचल पाटील ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे,स्मिता पाटील,कार्यकारी अभियंता जलसंधारण पंडित भोसले, प्रसाद कदम,सुनील कटकधोंड ,शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, भास्कर बाबर महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे,कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार ,डॉ. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नरळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एस. पी.माने.यांनी केले. चेअरमन श्रीशैल्य देशमुख यांनी प्रास्तविक तर आभार व्हाइस चेअरमन धन्यकुमार राठोड यांनी मानले. यावेळी मार्गदर्शक पंडित भोसले ,दयानंद परिचारक, ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके, अनिल जगताप,सुहास चेळेकर, हरिबा सपताळे,शाहाजाहान तांबोळी, सुंदर नागटिळक, विष्णू पाटील, शेखर जाधव ,सुखदेव भिंगे, श्रीमती मृणालिनी शिंदे ,श्रीमती सुनंदा यादगिरी, त्रिमूर्ती राऊत, तज्ञ संचालक डॉ.एस. पी. माने,होते सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे ,नितीन येमुल विनोद कदम आदीनी परिश्रम घेतले.


















