सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी संघटनेच्या वतीनेप्रभाग क्र१२ येथे तिरडी आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 12 मध्ये तीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि एक शिवसेनेचा नगरसेवक आहे मात्र मागील पाच वर्षांमध्ये या प्रभागात मूलभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत आहे तीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते.
याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने, नेते दिलीप धोत्रे, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहर अध्यक्ष जैनोद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाने मध्य विभाग अध्यक्ष व विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय आडम यांच्या नेतृत्वाखाली, शाखा अध्यक्ष गणेश पवार यांच्या वतीने अमरिश बरडे यांच्या सहकाऱ्याने प्रभागातील विविध समस्यांबाबत चारही नगरसेवकांचे निषेध करत तिरडी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात योगेश सोनवणे,रोहन,गायकवाड, आकाश काळे,ओंकार पुंजाल,बबलू चव्हाण राहुल जन्मले,अजय शहा,पुष्पक अडळगे,अमोल कोळी,प्रतिक गायकवाड,अमोल उम्रे कृष्षा चिंचोळे,राहुल कलशेट्टी,वरुण सोनशेट्टी मयुर क्षिरसागर यांचा समावेश होता.


















