मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते,जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोहोळ तालुक्यात नागरिकांचा जनता दरबार, उमेशदादा आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
रविवारी देगाव मध्ये कार्यक्रम झाल्यानंतर एक युवा शेतकरी वैतागलेल्या अवस्थेत उभा राहून आमचा रस्ता अजून झाला नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय केले असा प्रश्न सर्व ग्रामस्थांसमोर उपस्थित केला. हा प्रश्न शांतपणे ऐकून घेतल्यानंतर उमेश पाटील यांनी त्याचे समाधान होईल असे उत्तर दिले.
मुळात हा रस्ता प्लॅनमध्ये नाही, रस्ते प्लॅनमध्ये नसतील तर शासनाचा निधी मिळत नाही मात्र आता रस्ते प्लॅनमध्ये घातले जात आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता केला जाईल असा विश्वास त्यांनी दिला. हे उत्तर ऐकल्यावर तावातावाने आलेल्या युवा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले

















