सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, उत्तर सोलापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन, उत्तर सोलापुर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष, बीबीदारफळ चे माजी सरपंच श्री भगवान (दादा) बलभीम साखरे यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांची अंत्यसंस्कार सोमवारी दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 4:00 वाजता बीबीदारफळ येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून मागील अनेक वर्षे ते काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये कार्यालयीन सचिव म्हणून काम करत होते. त्यांना काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते दादा म्हणून संबोधत होते.
















