सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये प्रशासनाने कोरोना लसीकरण सक्तीचे केले आहे. शहरातील हॉटेल, बार,मॉल, दुकाने, व्यापारी, कारखाने यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना लसीकरण गरजेचे करण्यात आले असून तोंडावर मास्क बंधनकारक करण्यात आला आहे तसेच आता पेट्रोल पंपावर ज्यांचे दोन लस झाले आहेत अशांनाच पेट्रोल दिले जात आहे.
जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहरात निर्बंध सक्त केले असून तोंडावर मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाला ही सूचना देण्यात आल्या असून आता रस्त्यांवर पोलिसांच्या कारवाया दिसू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने निराळे वस्ती परिसरातील हॉटेल साईरत्न या ठिकाणी तपासणी केली असता त्या ठिकाणी कामगारांच्या तोंडावर मास्क आढळले नाहीत म्हणून थेट 10 हजार रुपये दंड केला आहे त्या दहा हजार रुपये दंडाची पावती सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.


















