सोलापूर : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बार्शी शहरातील एका युवकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी एसपी कार्यालय परिसरातील पोलिसांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात घेतले.
अमर पुरवले असे त्या युवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली यावेळी अमर पुरवले यांनी अधिक माहिती देताना सांगितले, बार्शी शहरातील शिवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये संचालक मंडळाने पुरवले यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून 25 लाखाचे कर्ज काढले ही जेव्हा माहिती त्यांना कळाली तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार केली. मात्र बार्शी शहर पोलिस याची दखल घेत नव्हते त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही शेवटी त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा पोलिस अधीक्षकांना दिला होता त्याप्रमाणे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास येऊन त्यांनी हा प्रकार केला…पहा हा व्हिडीओ

















