सोलापूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवकांना लसीचे दोन डोस आवश्यक केल्याने सभेसाठी येणाऱ्या नगरसेवकांची तपासणी करण्यात आल्याचे दिसून आले
शासनाच्या आदेशानुसार ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीचे दोन डोस आवश्यक केल्याने महापालिकेच्या सभेसाठी सुद्धा हा नियम आवश्यक केल्याचे दिसून आले त्याच अनुषंगाने महापालिकेच्या सर्व साधारण शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत सर्वसाधारण सभा आयोजित केली होती, या सभेसाठी येताना जे नगरसेवक ऑफलाईन सभेसाठी येणार आहेत, त्या नगरसेवकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावे याचे प्रमाणपत्र घेऊन येण्यास बंधनकारक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ज्यांनी एक लस घेतली आहे ते नगरसेवक ऑनलाइन सभेसाठी हजर राहू शकतात असा आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला होता.
त्यामुळे सभागृहाबाहेर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांच्या लसीच्या दोन्ही डोसच्या प्रमाणपत्राची तपासणी केल्याचे दिसून आले प्रशासनाच्या आदेशाला ही नगरसेवकांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान यावर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोण कोणत्या नगरसेवकांनी लस घेतली याचा पुरावा मागितला.


















