सुप्रिया या मागील अनेक वर्षापासून परराज्यातील महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होत्या.हि गोपनीय बातमी पोलिसांना समजल्यानंतर बोगस ग्राहक पाठवून बातमीची शहानिशा करून महिला पुरवणाऱ्या ऑंटीला रंगेहात पकडून तेथील दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.शहरात सुरू असलेल्या अवैद्य व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांना पोलीस आयुक्तांच्या विशेष टीम कडून जुळे सोलापुरातील वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार त्यांनी तात्काळ पंच बोलून याची माहिती काढत गुरुवार दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोगस ग्राहक पाठवून जुळे सोलापुरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला.
स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या व तासाला दीड हजार रुपये घेऊन महिला पुरवणाऱ्या अँटीला पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून रंगेहात पकडले.ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या विशेष पोलिसांनी केली.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा केल्याने त्यांच्याविरुद्ध सरकार तर्फे फिर्याद दाखल झाली आहे.यात सुप्रिया बालीका हिला पोलिसांनी अटक केली असून,त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले.ही कारवाई सपोनि इंद्रजीत वर्धन,वाघ,अफरोज शेख,सुभाष गायकवाड,डिगोळे आदींनी केली.पुढील तपास पोलिस करत आहेत.

















