सोलापूर: श्री. बृहन्मठ होटगी संचलित भवानी पेठ येथील वीरतपस्वी शिक्षण संकुलात लिंग्यक्य श्री ष ब्र तपोरत्नं योगिराजेद्र शिवाचार्य महास्वामिजी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात 201 रक्तदात्यांनी रक्तदान करून पूज्य तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या चरणी श्रद्धांजली समर्पण करून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून आपली सेवा समर्पित केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी हे होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य ष. ब्र. तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतय्या स्वामी म्हणाले, ‘मानव जातीवरील प्रकोप नाहीसे करण्यासाठी व समस्त जगाच्या कल्याणासाठी संतांच्या रुपात, गुरूच्या रुपात थोर पुण्यात्मा रुपात जन्मास आलेले परमपूज्य योगिराजेंद्र महास्वामीजीं यांनी आयुष्यभर स्वतः कष्ट करून सर्व धर्माच्या लोकांना एकत्र केले व जनसामान्याचे लोककल्याण करण्याचे कार्य केले.’ यावेळी प्रास्ताविक प्राचार्य राजकुमार भोरे यांनी केले.
या कार्यक्रमास वीरतपस्वी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार भोरे, उपप्राचार्य नंदकुमार धाये, पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे, संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे, शालेय समिती सदस्य मल्लिनाथ हिरेमठ, शिवानंद मुनाळे दादा, आमदार विजयकुमार देशमुख मालक, नगरसेवक नागेश वल्याळ, सभागृह नेते शिवानंद पाटील, प्रभाकर विभूते, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, राजकुमार पाटील, प्रकाश हत्ती, डॉ. गडक मॅडम, केदारनाथ उंबरजे, संचालक मार्केट कमिटी बसवराज इटकळे, ज्ञानेश्वर कारभारी, समीर पांडगळे, चंद्रकांत रमणशेट्टी, पाटील साहेब पेट्रोल पंप मालक, अनिल पंपटवांर, प्राथमिकचे मुख्याध्यापक केदारनाथ बचाटे , कन्नडच्या मुख्याध्यापिका सुनंदा कलशेट्टी,संस्थेतील विविध शाखांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, ब्लड बँकेचे पठाण साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलावती कुंभार, हणमंत यळमेली यांनी तर आभार प्रदर्शन मनोज हिरेमठ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुलतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

















