सोलापूर : ऐतिहासिक मानपञाची माहीतीपर वास्तूचे भूमीपूजन सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकाचंना यन्नम व विरोधीपक्ष नेते अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
ङाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचे एक घनिष्ठ नाते होते. दि 14 जानेवारी 1946 रोजी बाबासाहेबांची सोलापूर ची भेट अखेरची ठरली. सोलापूर म्युनिसिपल व जिल्हा लोकल बोर्ड या संस्थेच्या वतीने ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापूरचे नगराध्यक्ष कै. रावबहादूर नागप्पा अण्णा अब्दुलपूरकर यांनी मानपत्र दिले होते. या घटनेला दि 14 जानेवारी 2021 रोजी 75 वर्ष पूर्ण होत असून या सुर्वण स्मृती जपण्या करीता या ऐतिहासिक घटने बद्दल प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूर महानगरपालिकेत मुख्य प्रशस्त जागेवर मानपञाची माहीतीपर वास्तू उभारणारण्यात येत असून या वास्तूचे भूमीपूजन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोलापूर महानगर पालिकेचे महापौर श्रीकांचना यन्नम व विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रंसगी, साहित्यीक दत्ता गायकवाड, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खैरादी, नगर अभियंता संदीप कारंजे, साह्यक अभियंता आवताङे यांची प्रमुख उपस्थितीत होती.
प्रयास मागासवर्गीय संस्थेच्या अथक प्रयत्नातून सोलापूर महानगर पालिकेत उभारणार येणाऱ्या ऐतिहासिक मानपत्राच्या वास्तूमुळे बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळून युवकांना प्रेरणा मिळेल असे मत महापौर श्रीकांचना यन्नम आणि विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी साहित्यीक दत्ता गायकवाड, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
उपक्रमा मागील मुख्य भुमिका प्रयास मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी विशद केली.
यावेळी निलेश सोनवणे रविकांत बनसोडे,विकास नागटिळक, किरण खुणे, अजित नागटिळक, प्रफुल्ल धेङे, संकेत गायकवाड, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनवणे अविनाश भडकुबे, सचिन शिराळकर, सुरज गायकवाड आदी उपस्थित होते.

















