होटगी रोडवरील हाॅटेल समृद्धी यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या समृद्धी प्रीमियर लीग स्पर्धेस सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक पुष्कराज काडादी यांच्या हस्ते सिद्धेश्वर प्रशाला क्रीडा संकुल येथे मोठ्या थाटात शुभारंभ झाला.
ही क्रिकेट स्पर्धा खुल्या गटातील सर्व खेळाडूंसाठी आयोजित केलेली असून, विजेत्या संघास रोख रक्कम 11000/- पारितोषिक व विजेता ट्रॉफी , सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेचे किट व मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, अशा विविध बक्षिसांचे आयोजन केले असून सदर स्पर्धेत सर्व गटातील खेळाडूंनी भाग घेऊन उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.
समृद्धी प्रिमिअर लिगच्या उद्घाटन प्रसंगी निराणी शुगरचे सरव्यवस्थापक गजराज रुद्रमठ, उद्योजक नागेश रूपनर, उद्योजक सचिन पडळकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज खंदारे, सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक चांगले , म्हेत्रे, काटगाव सर, सुरक्षा विभाग प्रमुख पाटील, महेश आठवले,नागेंद्र कोगनुरे, अजित पाटील, आनंद गायकवाड, बलभिम गायकवाड, बाळासाहेब शेळके,बलभिम गायकवाड, रियाज तांबोळी, ज्ञानेश्वर पवार, प्रशांत जाधव, सद्दाम मोमीन, दस्तगीर शेख, निखिल कांबळे, प्रदिप चव्हाण, व परिसरातील बहुसंख्य क्रिकेटप्रेमीं मान्यवरांची उपस्थिती होती.
















