सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकची राजधानी बेंगरुळ येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ पुतळ्यावर कन्नड गुंडानी शाई मारुन विटंबना केली त्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं छत्रपती च्या पुतळ्यास अभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकची राजधानी बेंगरुळ येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ पुतळ्यावर कन्नड गुंडानी शाई मारुन विटंबना केली त्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवप्रेमींनी एकत्र येऊन कर्नाटक सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या भावना प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी उपमहापौर पद्माकर काळे, कार्याध्यक्ष संतोष पवार, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, कार्याध्यक्ष लता ढेरे, सिया मुलांनी, लता फुटाणे, अश्विनी भोसले, राजन जाधव, चंद्रकांत पवार, आंनद मुसतारे, गफूर शेख, राजू कुरेशी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांत साळवे, शाहरुख हुच्छे, यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलन कर्त्या शिवप्रेमींना ताब्यात घेतले.

















