सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या सोलापूर जिल्ह्यात ‘लेडी सिंगम’ म्हणून परिचित आहेत. आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्यांनी राज्यातील पोलिस प्रशासनात लक्ष वेधून घेतले आहे. ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यमातून पोलीस प्रशासनात एक आदर्श निर्माण केला असून हातभट्टी बनवून विकणाऱ्याचे मन परिवर्तन करून इतर व्यवसायाकडे वळवले आहे. जेव्हा याच लेडी सिंघम पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड होतात तेव्हा……,
होय तसेच घडले, उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवांची या गावात पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती, त्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे या उपस्थित होत्या. यावेळी एसपी सातपुते यांना चार बॉल खेळण्याची विनंती आयोजकांनी केली तेव्हा बॉलिंग सभापती भडकुंबे यांना करण्यास सांगितले. पहिल्याच बॉलवर सातपुते मॅडम क्लीन बोल्ड झाल्या, दुसरा बॉल हुकला मात्र तिसऱ्या बॉलवर त्यांनी चौकार मारला पहा तो मजेदार व्हिडीओ….


















