सोलापूर : आज प्रत्येक जण आपआपल्या जीवनात व्यस्त आहे. कोणाकडे आपल्या आसपास किंवा आप्तेष्ट, मित्रपरिवारात काय चालू आहे हे विचारायला सुध्दा फुरसत नाही. दररोजचं व्यस्त दिनक्रम वैयक्तिक कामांसाठी वेळ काढून विविध समारंभ,उद्घाटनाचे कार्यक्रम,सामाजिक-राजकिय कार्यक्रम या मध्ये आवर्जून उपस्थित राहणाऱ्या आमच्या सुदीप दादांनी आज माणुसकीचं दर्शन घडवलं .
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज गावातुन लग्नकार्याचा समारंभावरून माघारी येताना रस्त्यावर कारचा अपघात झाला होता. त्वरीत दादांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला व अपघातग्रस्तांची आस्थेने विचारपूस करून जवळील दवाखान्यात जाण्यासाठी पर्यायी वाहनाची व्यवस्था करून पाठविले व डॉक्टरांना तातडीने ईलाज करण्यासाठी सांगितले.दोन्ही कार च्या कुटुंबियांना फोन करून काळजी न करण्याची सांगितले.प्रचंड व्यस्त कार्यक्रम असताना देखील अपघातग्रसतांची केलीली मदत कौतुकास्पद आहे.

















