सोलापूर :- ग्राहक संरक्षण कायद्याची ग्राहकांमध्ये जागृती हवी म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक 24 डिसेंबर 2021 हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्राहक मेळावा, ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शन व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांच्या हस्ते दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता शिवछत्रपती रंगभवन सोलापूर येथे होणार आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव हे उपस्थित राहतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे (Varsha Landage) यांनी दिली आहे.
शिवछत्रपती रंगभवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनाचे ही आयोजन करण्यात आलेले असून दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्राहक प्रबोधन पर प्रदर्शन असणार आहे. तरी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमास व प्रदर्शनास जिल्ह्यातील जागरूक ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती लांडगे यांनी केले आहे.

















