सोलापूर- भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून खादिमाने उर्दू फोरमच्यावतीने उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय ऑनलाईन टेस्ट हिप्परगा येथील एन.के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात शहरातील वेगवेगळ्या शाळेतील एकूण 45 विद्यार्थ्यांनी सहभाग होऊन आपली ऑनलाईन टेस्ट दिली.
त्यानंतर महाविद्यालयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे डीन ॲडमिन डॉ. विपुल बाग, प्रा. अख्तर नदाफ, फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख, सचिव डॉ.म. शफी चोबदार, नासिरोद्दीन आळंदकर, इक्बाल बागबान, अ. मन्नान शेख, रफीक खान, सिराज बिजापुरे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नेण्यासाठी खादिमाने उर्दू फोरमच्या बसचे आयोजन करण्यात आले होते. या बसला नगरसेवक रियाज खरादी, अरबाज खरादी यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून सोडण्यात आले. यावेळी फोरमचे खजिनदार नजीर मुन्शी, शकील कादरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी नासिरोद्दीन आळंदकर यांनी कुरान पठण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर डॉ. म. शफी चोबदार यांनी वाचन प्रेरणा दिवस आयोजन करण्याचा हेतू विषद केला व त्यांनी पुढे सांगितले की, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नीट, सिईटी व शासकीय नौकरीसाठी एमपीएससी, युपीएससी व इतर परीक्षा हे ऑनलाईनच असतात. या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सराव व्हावा म्हणून फोरमच्यावतीने दरवर्षी असल्याप्रकारचे टेस्ट आयोजित केले जातात.
डॉ. विपुल बाग म्हणाले, आज आपण पहिल्यांदाच संगणकावर ऑनलाईन परीक्षा दिली याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. आपल्या जीवनात संगणक हे एक महत्त्वाचा भाग आहे. याचाशिवाय आपल्या ऑनलाईन कोठलेही गोष्ट करता येत नाही. ही आपली पहिली ऑनलाईन परीक्षा असेल, काही जणांना संगणक हाताळणे अवघड गेले असेल पण तुम्ही अजून सराव करून पुढील जीवनात चांगले हाताळू शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण त्यांचे मी महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करतो.
अध्यक्षीय भाषणात फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख सांगितले की, फोरम नेहमी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जे जे अडचणी येतात त्यांना सोडविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करते. यावेळी प्रा. अख्तर नदाफ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोशल हायस्कूलचे शिक्षक वजाहत शेख, पानगल हायस्कूलचा विद्यार्थी नुअमान शेख व ऑर्किडचे विद्यार्थिनी बीबीफतेमा बिजापूरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑर्किड महाविद्यालयाचे प्रा. अख्तर नदाफ, इक्बाल बागबान, नजहत शेख, भाग्यवान लोखंडे, साजिद बागबान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ. मन्नान शेख यांनी तर आभार म. इक्बाल बागबान यांनी मानले.
ऑनलाईन परीक्षेत पारितोषिक मिळालेले विद्यार्थी- प्रथम पारितोषिक टॅब- उस्ताद अनम सिद्दीक मुख्तार (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल), द्वितीय पारितोषिक स्मार्टफोन- नल्लामंदू रेहान म. उस्मान (सोशल हायस्कूल), तृतीय रोख ₹ १५००/- शेख नाजनीन अ. सलाम (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल) यांना देण्यात आले उत्तेजनार्थ पारितोषिक- जहागीरदार म. साद समीर (सोशल हायस्कूल), निगेहबान नाजिया आरीफ (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल), शेख, हुस्ना जमीर (सर सय्यद अहमदखाँ उर्दू हायस्कूल), शेख म. नोमान अफरोज (पानगल हायस्कूल), शाहपुरे आयेशा सलीम (म्हेत्रे हायस्कूल), मोमीन बीबी फातेमा शौकतअली (उर्दू माध्यमिक शाळा, मंद्रुप), पटेल म. साकीब युसूफ (प्रोग्रेसिव्ह हायस्कूल), शेख सादिया अ. सत्तार (सोशल हायस्कूल), काज़ी सानिया सलाउद्दीन (उर्दू माध्यमिक शाळा, मंद्रुप), शेख अल्फिया सैफन (म्हेत्रे हायस्कूल).

















