सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर शहरातील काही महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांशी निगडीत अशा मागण्या मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या कोरोना लॉकडाऊन मध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील युवकांवर 188 कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्यात यावेत त्यामुळे अनेक युवकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमध्ये जी उत्पन्न दाखल्यासाठी एकवीस हजाराची अट आहे ती मागे घेऊन ते पन्नास हजार रुपये उत्पन्न करावे यासह रमाई आवास योजने बाबतची महत्त्वपूर्ण अशी त्यांनी मागणी केली…पहा आमदार प्रणिती शिंदे यांनी कोणत्या मागण्या केल्या हा व्हिडीओ


















