सोमवार दि.२७/१२/२०२९ ते दि. ३१/१२/२०२१ दरम्यान रिक्षा चालकांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याबाबत पोलीस आयुक्त हरीश बैजल सोलापुर शहर यांचे कडुन आवाहन करण्यात आलेले आहे. या दरम्यान स्वतःची सुरक्षा तसेच सामाजिक जबाबदारी याचे भान किती रिक्षा चालक ठेवतात हे पाहिले जाईल. त्यानंतर देखील रिक्षा चालक वाहतुकीच्या नियमाचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास दि.३१/१२/२०२१ नंतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या बेजबाबदार रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व रिक्षा चालकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी केले आहे.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...














