सोलापुरातऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचा पक्षवाढीसाठी विविध पदांचा विस्तार करण्यात आला आहे. सोलापूर शहर व जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी (Faruq Shabdi) यांच्या हस्ते विद्यार्थी संघटना, महिला संघटना व इतर संघटनेच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक अझहर हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पद वाटपामध्ये नुकतेच मार्क्सवादी कम्युनिस्ट व प्रहार सोडून एमआयएम मध्ये दाखल झालेल्या -वसिम देशमुख यांना दक्षिण तालुका अध्यक्ष अ विभाग
२-तौसिफ काझी -दक्षिण तालुका अध्यक्ष ब विभाग
३- हमिद शेख- विद्यार्थी शहर अध्यक्ष
४- सलमा सय्यद- महिला अध्यक्ष शहर मध्य
५- अनिसा डोका- महिला अध्यक्ष नई जिंदगी विभाग असे पदे देण्यात आली आहेत.
यावेळी फारूक शाब्दी यांनी नूतन पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, आजपर्यंत इतरांना खूप दिले आता केवळ एमआयएमचे पतंग दिसले की बटन दाबा असे आवाहन केले

















