“संभाव्य ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यास तात्काळ क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”. पहिल्या लाटेत झालेली अवस्था पाहून क्वारंटाईन नकोच अशी मागणी नागरिकांची आहे.
सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर श्रीकांचना यन्नम (Shrikanchana Yannam) यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य करोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉन वेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ठेवून महाराष्ट्र शासनाकडून पालिकेच्या आरोग्य विभागास मार्गदर्शक तत्त्वे सांगितले आहेत, त्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे कि नाही, हे पहाण्या करिता सोमवारी पालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात बैठक घेण्यात आली.
यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक डॉ.किरण देशमुख, नगरसेवक बाबा मिस्त्री (Baba Mistri), नगरसेवक विनायक विटकर, उपायुक्त धनराज पांडे, (Dhanraj Pande) आरोग्य अधिकारी ए एस लोहारे, डाॅ मंजरी कुलकर्णी आदींच्या प्रमुख उपस्थितीत होती.महापालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने नियोजन करून तिसरे लाट आल्यावर नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी तसेच प्रशासनाच्या वतीने चांगल्या पद्धतीने काम सुरू असून शहरातील नागरिकांचे पहिला डोस न घेतलेले साठी लसीकरण करून घ्यावे तसेच लसीकरणावरती जास्तीत जास्त भर द्यावे व पूर्वतयारी म्हणून सगळ्यांनी चांगले काम करावे अशी अपेक्षा यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम व्यक्त केल्या.
करोनाची तिसरी लाट शहरांमध्ये आली तर, पालिकेचे आरोग्य विभाग सज्ज असून या करिता शहरातील जवळपास सहा रुग्णालय रुग्णांच्या सेवेत करिता राखीव ठेवण्यात येणार आहेत,तसेच रूग्णालयात डॉक्टर नर्सचा स्टाफ राखीव ठेवण्यात आला आहे, संभाव्य ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यास तात्काळ क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पालिकेच्या आरोग्य विभागकडून ओमिक्रॉन रूग्णा करिता स्वतंत्र यंत्रणा उभा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी या बैठकीत दिली.
तिसरा लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या निर्देशांक प्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून चौख आरोग्य व्यवस्था करण्यात आली आहे पण पालिकेच्या आरोग्य विभागकडे आवश्यक इतके मनुष्यबळ नाही याकरता पालिका आयुक्तांकडे लवकरच बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढू असा विश्वास नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी व्यक्त केले .


















