सोलापुर :- भिम युवक क्रिंडा मंडळ व एस पी प्रतिष्ठान अयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात ६ जोडप्यानी रेशीमगाठ बाधत सोनेरी आयुष्याला सुरुवात केली चौथ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार विविध स्तरातील मान्यवरांनी हजेरी लावली सिध्देश्वर पांडगळे याच्या मार्गदर्शना खाली समीर पांडगळे यांच्या नेतृत्वाखाली एस पी प्रतिष्ठानच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.
विवाह सोहळयाचे ४ थे वर्ष होते. आलेल्या वऱ्हाडी मंडळींना मास्कची व्यवस्था करण्यात आली हाेती, वधुवरांच्या मोजक्या व्यक्तींना लग्नसोहळ्यात उपस्थित असलेल्या वधुवरांच्या पालक व नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले, प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधू वरांना कपडे वधूंना मंगळसूत्र संसारोपयोगी भांडी राजा रानी कपाट बेड जोडवे देण्यात आले.
या सोहळ्याला सिनेमा अभिनेत्री संतोषी वाघमारे, कोमल चौगुले, सुभान बनसोडे, संजीव सदाफुले, अशोक सरवदे, पुरुषोत्तम बरडे,नगरसेवक सुरेश पाटील, बाळासाहेब गायकवाड, चन्नविर चिट्टे, अजित गायकवाड,अरुण भालेराव, सचिन चांदणेरी, बाळासाहेब वाघमारे, कुणाल बाबरे, राजकुमार पाटील,अंबादास नडगिरी, शहबाज शेख,बाळासाहेब वाघमारे,शशिकांत बापू कांबळे, दीपक बनसोडे दत्ता सरवदे प्रमोद रणदिवे आदी सह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते
















