सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संजय रामु ऊर्फ रामा पवार वय ३९ वर्षे, रा. ९५, मुळेगाव, लमाण तांडा, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये दि.०४/०१/२०२२ रोजी स्थानबध्द केले आहे.
संजय पवार हा त्याच्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अवैध गावठी हातभट्टी दारुच्या व्यवसायात गुंतलेला आहे. तो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करुन हातभट्टी दारुची वाहतुक, पुरवठा आणि विक्री करत असल्याबद्दल त्याचे विरुध्द एकूण ६९ गुन्हे दाखल आहेत. सन २०१३ २०१९ व २०२० मध्ये क.९३ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याचे गुन्हेगारी वर्तणूक सुटत नव्हती. त्याने पुन्हा अवैध हातभट्टी दारुचा व्यवसाय चालूच ठेवलेला होता. सन २०२१ मध्ये अगदी अलीकडील कालावधीत त्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करुन १२ गुन्हे केलेले आहेत.
संजय पवार हा हातभट्टी दारु व्यवसायाचा मालक आहे. हातभट्टी दारुची वाहतुक करताना तो आणि त्याचे साथीदारासह त्यांची वाहने निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरून जाणा-या लोकांच्या आणि परिसरातील रहिवाशी यांच्या जिवीतास धोका निर्माण करत आहे. त्याच्या बेकायदा व्यवसायास विरोध करणारे किंवा पोलीसांना माहिती देणारे लोकांना तो त्याच्या साथीदारासह उघडपणे शस्त्रासह मारहाण करतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन संजय पवार याने परिसरात दहशत निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे..
संजय पवार यांच्या अवैध हातभट्टी दारुच्या व्यवसायामुळे एमआयडीसी पो. ठाणे हद्दीतील सार्वजनिक सुव्यवस्था बाधीत होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे भविष्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची तिसरी व या वर्षातील पहिली कार्यवाही आहे.
पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेशाप्रमाणे बापू बांगर पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय साळुंखे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस व विशेषतः एमपीडीए पथकातील अंमलदार पोना-/८३३ विनायक संगमवार, पोना/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१७१४ पांडुरंग धानुरे, पोशि/ १९१६ अक्षय जाधव, पोशि/ ६५४ विशाल नवले यांनी वपोनि एमआयडीसी पोलीस ठाणे संजय पवार यांचे सहकार्याने सदरची कामगिरी पार पाडली आहे.

















