सोलापूर : अचानक शाळेला कुलूप घालून संस्थाचालकांनी सर्वच पालकांना विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले घेऊन जाण्याची भाषा केल्याने एकच गोंधळ उडाला आहे.पहा हा व्हिडीओ
देगाव नाका परिसरात थोबडे वस्ती या ठिकाणी रितेश बालक मंदिर नावाची शाळा आहे, ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत असून गुरुवारी नेहमीप्रमाणे पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेत गेले असता शाळेला कुलूप दिसले विचारणा केली असता संस्थाचालकांनी कुलूप घातले असून आता विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे दाखले घेऊन जावा असे सांगण्यात आले.
त्यामुळे एकच गोंधळ उडाला शेकडो विद्यार्थी पालक सध्या शाळेसमोर थांबून आहेत ही शाळा सोलापुरातील जेष्ठ आणि नामवंत विधिज्ञ यांची असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले त्यांच्या मुलाच्या नावाने शाळा आहे. काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपणास ही काही माहीत नाही असे उत्तर दिले.
या शाळेच्या मुख्याध्यापिका यांना विचारणा केली असता संस्थाचालकांनी आपणाला ज्या सूचना केल्या त्या सांगितल्याचे माहिती दिली. त्यामुळे सध्या गोंधळ सुरू असून पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे कोरोणा संसर्ग वाढत असल्याने सर्व महाविद्यालय बंद करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत आता शाळेचा निर्णय अद्यापी झाला नाही, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या कोरूना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी अजून कोणताही निर्णय घेतला नाही.

















