दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजुर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजशेखर सोनकटले तर उपाध्यक्षपदी सुरगपा यलगौंडे व कार्याध्यक्षपदी तुकाराम माळवाडी यांची तर शिक्षकतज्ञ म्हणून भिमाशंकर नरुटे यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
यावेळी माजी सभापती अशोक देवकते, चेअरमन कृष्णा बिराजदार, हनुमंतराव बिराजदार, उपसरपंच सतीश देवकते, सुभाष देवकते, राहुल देवकते, सरपंच लक्ष्मण गडदे, तंटामुक्त अध्यक्ष अभिमन्यू पाटील, शंकर बिराजदार, विकास यलगौंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व शालेय नुतन समिती सदस्यांचा देवकते परिवाराकडून सत्कार करण्यात आला.

















