सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गाडीत त्यांच्या शेजारी जागा मिळवलेले गटनेते आनंद चंदनशिवे यांनी शनिवारी पत्रकार दिनाच औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान केला. बहुजन समाज पक्षातून निवडून आल्या नंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे काम केले, पुढे वंचित मध्ये प्रवेश केला, पंढरपूर पोटनिवडणुकीवेळी त्यांनी वंचितला सोडले, आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत.
अद्याप त्यांनी प्रवेश केला नसला तरी पालकमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे ते झाल्याचं चित्र आहे. पत्रकारांच्या सत्कारावेळी काही ज्येष्ठ पत्रकारांनी चंदनशिवे यांचे काही किस्से सांगितले, सध्या त्यांचे इंदापूर, बारामती आणि पुण्याचे दौरे वाढले आहेत मात्र योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला देण्यात आला.
यानंतर बोलताना त्यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली, इंदापूरला वाढलेल्या दौर्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले, तसेच यावेळी त्यांनी काही पत्रकार माझ्या बातम्या लावत नसले तरी मी असे काही करतो की त्यांना बातम्या लावण्यास भाग पडतो असे सांगून उपस्थितांमध्ये हशा पिकवला….

















